दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर: येथील राजुर अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीची दुसरी अधिमंडळ वार्षिक सभा उत्साहात संपन्न झाली.या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व उद्घाटक मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा निर्मलाताई दानवे, राजुर अर्बनचे ज्येष्ठ सभासद विनायकराव कढवणे,सुळे मामा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंचावर जिल्हा परिषद सदस्य कैलास पुंगळे,रुद्रानी फाउंडेशनचे अध्यक्ष भीमाशंकरा आप्पा दारूवाले, योगिताताई दानवे,सुशीलाताई दानवे,शोभाताई मतकर, आशाताई पुंगळे,आशाताई माळी,रोहिणीताई,विनोद वीर, सुनील देवरे,मंगेश देहेडकर,श्याम बोरबळे,श्रीरंग भोईटे, राजूर अर्बनचे अध्यक्ष कैलास गबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम चंद्रकांत बोर्डे यांनी गायलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.त्यानंतर राजूर अर्बनच्या वतीने कार्यक्रमाच्या उद्घाटक निर्मलाताई दानवे यांचा शाल,पुष्पहार व पंचधातूंची नटराजाची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले.तसेच व्यासपीठावरील इतर मान्यवरांचेही पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर शहीद झालेले जवान तसेच मृत्यू पावलेले बँकेचे सभासद,विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प्रास्ताविकातून राजूर अर्बनचे संस्थापक कैलासआप्पा गबाळे यांनीअहवाल वाचनातून सभासद ठेवी व कर्जवाटप याविषयी सविस्तर माहिती दिली.त्यानंतर अनेक ठराव सभासदांच्या आवाजी मताने मंजूर करण्यात आले.यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!