दर्पण सहयाद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
भोकरदन:तालुक्यातील हसनाबद येथे वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचा सातवा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने वर्धमान नागरी पतसंस्था आणि जालना येथील जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४९ दात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून रकदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला.यावेळी संस्था अध्यक्ष शांतीलाल सिंगी,संचालक अविनाश कोटुंबे, शाखा सल्लागार रुपेश राठी,दिलीप लढ्ढा,शंकर तंगे,राजू इंगळे,रमेश कुमावत,माजी सरपंच राजेश कंगले,भानुदास सोळुंके,संस्थेचे विभागीय व्यवस्थापक दत्ता पवार,बाळकृष्ण रासने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे विभागीय व्यवस्थापक दत्ता पवार यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या माध्यमातून चालणाऱ्या सामाजिक उपक्रमांविषयी माहिती सांगून खातेदारांसमोर हसनाबाद शाखेचा अहवाल मांडला.तर बाळकृष्ण रासने यांनी संस्थेच्या वतीने ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि सुविधांविषयी समाधान व्यक्त करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.राजकुमार झंवर,वंदना शेळके,अनुप मोहिते, भागवत वाघमारे, उज्ज्वला सिस्टर, पूजा चिप्पा ,शाखा व्यवस्थापक दीपक तंगे,कर्ज अधिकारी बाळकृष्ण महाशब्दे,कॅशियर सचिन पवार,लिपिक मयूर वायकोस,रोहिणी राऊत,शिपाई विष्णू बोर्डे,नारायण जाधव यांसह खातेदार,कर्मचारी व पिग्मी प्रतिनिधी उपस्थित होते.
