दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

पानिपत:आज 14 जानेवारी. हा दिवस मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यात घनघोर युद्ध झाले होते.

  या युध्दात महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील योद्धा कामी आला होता.इतिहासातील नोंदीनुसार पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांच्या शौर्याला जगात तोड नाही. या युद्धामुळे पुन्हा एकदा मराठा सैनिकांच्या शौर्याची ओळख जगाला झाली.

महाराष्ट्रातून मुघलांचा पराभव करून मराठा सैनिक पानिपतला पोहोचले.मातृभूमी, स्वराज्याचा स्वाभिमान आणि आयाबहिणींच्या रक्षणासाठी मराठा सैनिकांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता सर्वोच्च बलिदान दिल्याचे इतिहास सांगतो.

पानिपत मधील काला आंब या शौर्याचा साक्षीदार ठरला.मराठे शौर्य दिनाला आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून एकत्र येतात आणि पूर्वजांच्या पराक्रमाचे स्मरण करतात. 14 जानेवारी 1761 रोजी हजारो मराठा योद्ध्यांनी पानिपतच्या काळा आंबच्या रणांगणात देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाचे रक्षण केले होते.

या युद्धात जे मराठा सैनिक शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रासह हरियाणातील रोड मराठा समाजाच्या वतीने दरवर्षी 14 जानेवारी रोजी शौर्य दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.14 जानेवारी शौर्य दिनानिमित्त देशासाठी जीवन समर्पित करणाऱ्या थोर मराठा योद्ध्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी नमन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!