दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर येथे दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी राजूर ग्रामपंचायतच्या वतीने गरजूंना मिठाई व दिवाळी साहित्य वाटण्यात आले.यावेळी सरपंच भाऊसाहेब भुजंग, उपसरपंच विनोद डवले, ग्रामविकास अधिकारी प्रमोद पुंगळे , ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
श्रीलंकेत रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम विजयी होऊन अयोध्येत परतले तेव्हा अयोध्या शहरातील नागरिकांनी दीपोत्सव साजरा करून भगवान श्रीरामाचे भव्य स्वागत केले होते. तीच परंपरा आजही कायम आहे.तेव्हापासून संपूर्ण भारतात दीपोत्सव साजरा केला जातो.

याहीवर्षी दिवाळीला राजूर येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दिव्यांच्या रोषणाईने केली होती. त्यामुळे राजूर शहर दिव्यांनी उजळून निघाले होते.यावर्षी दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. राजूर ग्रामपंचायतच्या वतीने सर्व जनतेस शुभेच्छा देण्यात आल्या.दीपावली निमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी राजूरचे सरपंच भाऊसाहेब भुजंग यांनी ही दिवाळी आनंदाची,सुख-समाधानाची व भरभराटीची जाओ अशा सर्व जनतेस शुभेच्छा दिल्या.
