दर्पण सह्याद्री न्यूज 

    राजुरेश्वराचे सेवेकरी,तिरुपती बालाजीच्या द्वारी; ‘श्री’च्या सेवेकरींचा निष्काम सेवा करण्याचा संकल्प

श्रीक्षेत्र राजूर येथील एकोणसाठ’श्री’चे सेवेकरी, तिरुपती बालाजीच्या दरबारी निष्काम व समर्पित सेवा देण्यासाठी  आज सकाळी चार वाजता तिरूपती संस्थांकडे रवाना झाले आहेत.त्याप्रसंगी राजुरेश्वराच्या पायथ्याशी श्रीच्या सेवेकरींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला असून पुढील दहा दिवसीय सेवाकार्यासाठी राजूरकरांनी शुभेच्छा दिल्या.

मागील काही वर्षांपासून श्रीक्षेत्र राजुरेश्वर येथे प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी’श्री’चे सेवेकरी मंदिर परिसर स्वच्छता, पाणी वाटप, आरोग्य सुविधा,फराळ वाटप यासारख्या सेवा पुरवितात.श्री राजुरेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या मदतीला सेवेकरी धावून जातात.सुरवातीस सेवेकरींची संख्या कमी होती परंतु आता मात्र त्यात वाढ होऊन सभोवतालच्या खेड्यांतील अनेक सेवेकरी भगवान राजुरेश्वराच्या दरबारात निष्काम सेवा देत आहेत.कोरोना काळातही श्रीच्या सेवेकरींनी अनेक समाजभिमुख उपक्रम राबविले होते.

श्रीक्षेत्र राजूर येथील श्रीच्या सेवेकऱ्यांची मागील चार वर्षापासून तिरूपती बालाजी संस्थांमध्ये जाऊन दहा दिवसांची निष्काम सेवा करण्याची इच्छा होती.परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही संधी मिळू शकली नाही.परंतु लॉकडाऊन नंतर शिक्षक,शेतकरी,व्यापारी वर्गातील सेवेकऱ्यांनी बालाजी संस्थांकडे पूर्वनोंदणी केली होती. त्यांच्या इच्छेला हाक देत तिरुपती बालाजी संस्थानने आज एकोणसाठ सेवेकरींना अकरा ते एकवीस ऑक्टोंबर या दरम्यान सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. उशिरा का होईना परंतु तिरुपती बालाजी संस्थान येथे सेवा करण्याची मनोकामना पूर्ण झाल्याने श्रीच्या सेवेकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

आज सकाळी चार वाजता सेवेकरी श्रीक्षेत्र राजुरेश्वर येथून प्रस्थान करीत जालना येथून रेल्वेने तिरुपती बालाजीकडे रवाना झाले.तत्पूर्वी राजूर येथ प्रा.बाळासाहेब बोराडे, भीमाशंकर दारुवाले,कैलास गबाळे,डॉ.ईश्वर जटाळे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ देऊन सेवेकऱ्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील सेवा कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!