चनेगाव येथील जि.प.शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष किती महत्वाची भूमिका निभावतात ही बाब लक्षात घेऊन राजूरपासून जवळ असलेल्या चनेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात समाजभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते,ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातुन मान्यवरांच्या हस्ते विविध झाडांच्या कलमांची लागवड करण्यात आली.

वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रा.बाळासाहेब बोराडे,बांधकाम व्यावसायिक भीमाशंकर दारुवाले,सरपंच निवृत्ती शेवाळे,साहेबराव ठोंबरे, पांडुरंग इंगळे,शालेय समितीचे अध्यक्ष जीवन घुगे,मुख्याध्यापक सतीश महापुरकर पुंजाराम निहाळ, गणेश काफरे,संतोष जायभायेआदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी प्रा.बोराडे यांनी वृक्षारोपण बरोबरच वृक्षसंवर्धनाचे महत्वाचे पटवून दिले तर वृक्षांमध्ये त्याग व परोपकारी भावना असल्याचे मत सरपंच निवृत्ती शेवाळे यांनी सांगितले.भावी पिढीच्या सुखासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे शा.स.अध्यक्ष जीवन घुगे यांनी व्यक्त केले.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्वाची भूमिका निभावत असल्याचे मत मुख्याध्यापक सतीश महापुरकर यांनी व्यक्त केले.

व्यावसायिक भीमाशंकर दारुवाले यांनी वृक्षच्या कलमा उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.प्रा.बोराडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून स्मरण शक्तीचा खेळ घेतला.विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.स्पर्धेतील विजयी विद्यार्थिनी जयश्री निहाळ हिचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सपकाळ, सूत्रसंचालन रवींद्र चेके तर आभार प्रदर्शन श्री डोईफोडे यांनी केले.या कार्यक्रमास ग्रामस्थ,शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!