दर्पण सह्याद्री न्यूज/बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर:
पोलीस अधीक्षक कार्यालय जालना यांच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव नुकताच करण्यात आला.

हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे,पोलीस काँनिस्टेबल राहुल भागिले, नरहरी खार्डे व सहकाऱ्यांनी चांदई एक्को येथील वयोवृद्ध महिला खून प्रकरणाचा उलगडा करून गुन्हे तपास कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस काँनिस्टबल राहुल भागीले,नरहरी खार्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चांदई एक्को येथील खून प्रकरणाचा उलगडा करण्यास यश मिळाले होते.चांदई एक्को येथे 29 एप्रिल रोजी अज्ञातांनी वयोवृद्ध महिलांचा खून करून तिच्या अंगावरील दागिने चोरून पसार झाले होते. सदरील गुन्हा गंभीर स्वरूपाचा व संवेदनशील असल्याने घटनेच्या मुळाशी जाऊन उलगडा होणे गरजेचे होते.

पोलीस काँन्स्टेबल राहुल भागीले,नरहरी खारडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक बाबीच्या मदतीने 36 तासात या गंभीर गुन्हेगारांचा शोध लावून आरोपींना ताब्यात घेऊन चोरून नेलेली दागिने व रोख रक्कम जप्त केली होती. खून प्रकरणाचा छडा लावून गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
