दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर
येथील जि.ई.एस.एज्युकेशनल ग्रुपमध्ये ज्ञानपीठ विजेते कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिवस मोठया उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे, मुख्याध्यापिका आशाताई पुंगळे यांच्या हस्ते वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शिक्षक विष्णू मिसाळ यांनी कुसुमाग्रजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून मराठी भाषेची महती सांगितली. शिक्षिका अनिता उगले यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून संपूर्ण परिपाठ मराठी भाषेतून घेतला.यावेळी अवनी बोराडे,मनवी पिंपळे,अर्निका शेळके, मिहीर दाभाडे, चैतन्य ढवळे,रियांशी जाधव,ऋतुजा शेळके, मनस्वी उगले, आराध्या रेगुडे,आयुष बारोकर, स्वराज पवार या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास सुदर्शन रामटेके,दत्तू ठोंबरे ,विष्णू मिसाळ, दिपक डवले,गणेश मोरे,सिध्दार्थ रगडे,सुधीर कातखडे, वरद पुंगळे,नारायण नवले,किशोर पवार,रामेश्वर कुटे,भूषण यादव, बालाजी शितोळे,अजय जाधव,सुरज मलिक, मीनाक्षी राऊत ,वैशाली गिरी ,मीरा गोरे ,वंदना थोटे,उषा जाधव,माधवी माने, नयना पिंपळे,अनिता मेहेत्रे,अनिता उगले,पदमा मलिक,कोमल खरात,छाया शेंडे,स्वाती शेजुळ, शिक्षकेत्तर कर्मचारी कैलास बावस्कर,सुनील गटकाळ,अविष्कार पुंगळे,बाबासाहेब जाधव, सुनील साळवे,वैभव नवले यांची उपस्थिती होती.
