दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर: येथील मोरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला असून तब्बल 18 वर्षांनी शिक्षक व वर्गमित्रांनी एकत्र येऊन शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.सन 2005-2006 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.हा कार्यक्रम राजुरेश्वर गौशाळा परिसरात संपन्न झाला.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी मंचावर शिक्षक संतोष इंगळे ,भगवान रगड, सुळसुळे सर,अग्रवाल सर, माळी सर, शिंदे सर,देशपांडे सर,सूर्यवंशी सर,कदम सर, नागरे सर, साखरे सर, जोशी सर, पंचभैय्ये सर,थोटे मामा आदिजन उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी शाल,पुष्गुच्छ व भेट वस्तू देऊन शिक्षकांचा सत्कार केला. शिक्षकांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून जुन्या आठवणींना उजाळा दिला.शेवटी शिक्षक,विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उषा कुमकर,शमा शेख, भाग्यश्री थोटे,प्रविण पुंगळे,ज्ञानेश्वर पुंगळे,शैलेश काबरा, सचिन दाभाडे,भगवान ठोंबरे,राहूल धनवटे,विठ्ठल शेजुळू, संदीप मगरे, मिलींद जाधव,दिपक फुके,सुदाम जगताप, गजानन सानप, हरिदास भूमकर, अंकुश कुमकर ,शंकर नागवे यांच्यासह वर्ग मित्रांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती भालेराव तर आभार सविता रजाळे यांनी मानले.
