दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर: येथून जवळ असलेल्या थिगळखेडा येथील कवी श्रीमंत ढवळे यांना सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भोकरदन येथे संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

संत रविदास बहुभाषिक चर्मकार जनहित सेवा समितीचे अध्यक्ष महादु सुरडकर, मा.आमदार मदनराव कुलकर्णी यांच्या शुभहस्ते ढवळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार मिळाला याबद्दल ढवळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
