दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर
येथे ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट, महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन,राजूर केमिस्ट ,डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त ओम रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न झाले.
सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या शिबिरास प्रारंभ करण्यात आला. यामध्ये एकूण 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले.आयोजकाच्या वतीने रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. सुदर्शन थोटे, डॉ ईश्वर जटाळे, डॉ गणेश कदम, डॉ जैस्वाल, शरद थोटे, उमेश भालेराव, अशोक आदमाने, चंद्रकांत फुलसुंदर, अनंता नागवे, नारायण शेळके, शिवाजी सोनुने, ज्ञानेश्वर साबळे, मनोज साबळे, अरविंद पिंपळे, भारत थोटे,संदीप होलगे,विनोद पुंगळे, सतीश ढसाळ,उमेश कुमकर,
प्रकाश व्यवहारे,संदीप सिरसाट,दत्ता पुंगळे, जनार्धन टोम्पे, गणेश अग्रवाल, अभिषेक बावस्कर, पंढरीनाथ ठोंबरे, कैलास आदबाने, अजय अग्रवाल आदींनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी राजूर केमिस्ट, डॉक्टर असोसिएशनने परीश्रम घेतले.
