दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर:
राजूर येथील मोरेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून विद्यालयाच्या प्रांगणात निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तो नुकताच संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संतोष पाटील सोनवणे, विभाग प्रमुख प्रा.श्री पी.टी.मोहिते,प्रमुख मार्गदर्शक प्रा.आसाराम बोटूळे यांची उपस्थिती होती.
याकार्यक्रमास कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मनोगतातून अनुभव कथन करत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देत ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
आत्मविश्वास गमावलेली व्यक्ती जीवनात यश प्राप्त करू शकत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय समोर ठेवून यश संपादन करावे.सुशिक्षित होण्याबरोबरच सुसंस्कारित होणे हीसुद्धा काळाची गरज असल्याचे मत कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.आसाराम बुटुळे यांनी व्यक्त केले.तर
समाजात जबाबदार नागरिक घडवणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसायामधून रोजगारांच्या संधी निर्माण कराव्यात.तसेच अभ्यासाचे योग्य नियोजन करून तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे असे मत प्राचार्य संतोष सोनुने यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रा.टी.डी.अंभोरे, प्रा.आर.व्ही लोणीकर, प्रा.एस.बी. चौधरी, प्रा.एस.बी.दाभाडे, प्रा.व्ही. एस.साखरे, प्रा.श्रीमती आर.व्ही.मोरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ए.आर.ठोंबरे यांनी तर आभार प्रा.एस.एम.अंभोरे यांनी मानले.
