दर्पण सह्याद्री न्यूज 

श्रीक्षेत्र राजूर

जालना- राजुर महामार्गावर पिरपिंपळगाव ते मानदेऊळगाव यादरम्यान जवळपास सतरा ठिकाणी अनधिकृतपणे गतिरोधक टाकण्यात आल्याने अपघात होऊन लोकं जखमी होत आहेत.संबंधित विभागाने या ठिकाणची नियमबाह्य गतिरोधकं त्वरीत काढावि अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल अशा प्रकारचे निवेदन रुद्राणी फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना देण्यात आले.

जालना-राजुर रोडवरील माणदेऊळगाव ते पिरपिंपळगाव दरम्यान जवळपास सतरा ते आठरा गतिरोधक नियमबाह्य टाकले आहेत.त्यामुळे अनेक वाहनधारक अपघात होऊन जखमी झाले तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. गतिरोधक काढण्यासाठी याअगोदरही प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते. परंतु ढिम्म प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

सदरील ठिकाणचे अनधिकृत गतिरोधक तत्काळ काढुन टाकावे नसता संबंधित विभागाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर रुद्राणी फाऊंडेशनचे अध्यक्ष भीमाशंकर दारुवाले,पांडुरंग पा इंगळे, कैलास गबाळे, साहेबराव पवार, गजानन सानप, पद्माकर चंदनशिवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!