दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर
नुकतेच 2025 साल लागले आहे.प्रत्येकजण आपापल्या परीने नववर्षाचा नवसंकल्प करीत असतो.इच्छेनुसार प्रत्येकाचा संकल्प वेगळा असतो.निरोगी आयुष्य, पर्यावरण संवर्धन,व्यवसाय,शिक्षण व क्रीडा क्षेत्रात करिअर घडवणे, सामाजिक कार्यात सहभाग यासारख्या अनेक बाबींचा संकल्प असतो.नववर्षानिमित्त श्रीक्षेत्र राजुर येथील महिलांनी एकत्रित येऊन राजुरेश्वर मंदिरात श्रमदान करण्याचा संकल्प केला.सेवा कार्यात आवड असणाऱ्या महिलांचा एक गट तयार करण्यात आला असून महिन्यात दोन दिवस राजुरेश्वर मंदिरात श्रमदान व सेवकार्य करणार असल्याचे सरपंच प्रतिभा भुजंग यांनी सांगितले.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सेवा कार्याचा श्रीगणेशा करण्यात आला.पहिल्याच दिवशी 18 महिलांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.या उपक्रमात सरपंच प्रतिभा भुजंग, योगिता दानवे, जिजाबाई करपे,मनीषा माळी, मंदा लोखंडे, लता मिसाळ, सुवर्णा निहाळ,पुष्पा पुंगळे,आशा पारवे,माया नागवे,मनीषा इंगळे,कविता टेपले,निर्मला सुद्रिक,अनिता इंगळे,छाया चव्हाण,लता शेवाळे,उज्वला बारवकर,राधा बांदल, आरती दरक, सोनाली भुजंग,लंका माने यांच्यासह अनेक महिलांनी सहभाग घेतला.
