दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर:
भोकरदन तालुक्यातील राजूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थी ऋतुजा थोटे,संस्कार रगडे ,वैष्णवी पंडित ,आकांक्षा पारवे यांनी माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी सुधाकर पाटील दानवे ,शिवाजीराव पुंगळे, कैलास पुंगळे, भगवान नागवे,पंढरीनाथ करपे, संदीप पडोळ ,सतीश टोम्पे, उद्धव घायाळ, आकाश पुंगळे, अनिल पुंगळे, सतीश तवले,नितीन पुंगळे,संदीप मगरे, बबन मगरे, शाळेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे, मुख्याध्यापिका आशाताई पुंगळे यांची उपस्थिती होती.

शिक्षक सुदर्शन रामटेके, दत्तू ठोंबरे, विष्णू मिसाळ, दिपक डवले,गणेश मोरे,सिध्दार्थ रगडे, सुधीर कातखडे, वरद पुंगळे, नारायण नवले, किशोर पवार, रामेश्वर कुटे, भूषण यादव, बालाजी शितोळे, अजय जाधव, सुरज मलिक तसेच शिक्षिका 
मीनाक्षी राऊत ,वैशाली गिरी ,मीरा गोरे ,वंदना थोटे, उषा जाधव, माधवी माने,नयना पिंपळे,अनिता मेहेत्रे,अनिता उगले, पदमा मलिक,कोमल खरात, छाया शेंडे,स्वाती शेजुळ यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
