दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर
भोकरदन तालुक्यातील राजुर येथे जिईएस शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एक हजार विद्यार्थ्यांनी समूहिक वाचन करून आगळीवेगळी जयंती साजरी करण्यात आली .
तसेच शाळेच्या वतीने फॅन्सी ड्रेस, चित्रकला स्पर्धा,भाषण स्पर्धा,सामूहिक वाचन यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रे काढुन व सलग एक तास वाचन करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे,मुख्याध्यापिका आशाताई पुंगळे,सुदर्शन रामटेके,दत्तू ठोंबरे,विष्णू मिसाळ, दिपक डवले ,गणेश मोरे, सिध्दार्थ रगडे,सुधीर कातखडे,वरद पुंगळे, नारायण नवले, किशोर पवार,रामेश्वर कुटे, भूषण यादव,बालाजी शितोळे, अजय जाधव,सुरज मलिक, मीनाक्षी राऊत ,वैशाली गिरी ,मीरा गोरे ,वंदना थोटे, उषा जाधव, माधवी माने, नयना पिंपळे,अनिता मेहेत्रे ,अनिता उगले, पदमा मलिक,कोमल खरात, छाया शेंडे, शिक्षकेत्तर कर्मचारी कैलास बावस्कर, सुनील गटकाळ,अविष्कार पुंगळे ,बाबासाहेब जाधव,सुनील साळवे,वैभव नवले यांची उपस्थिती होती.
