दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजूर

विद्यार्थ्यांच्या मानसिक,भाषिक विकासा बरोबरच शारीरिक विकास व सुप्त कलागुणांना वाव मिळाआणि क्रीडा नैपुण्य प्राप्त व्हावे म्हणून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी चांदई एक्को केंद्र अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन चांदई ठोंबरी येथील शालेय समितीचे अध्यक्ष योगेश ठोंबरे, केंद्रप्रमुख आण्णा इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच साहेबराव ठोंबरे, गणेश देठे, रवींद्र घोरपडे तसेच पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

कबड्डी मुलांमध्ये वर्ग पहिली ते पाचवी गटात धनगरवाडी, सहावी ते आठवी गटात चांदई ठोंबरी व मुलींमध्ये वर्ग पहिली ते पाचवी गटात चांदई एक्को, सहावी ते आठवी गटात चांदई ठोबरी, खो-खो मुले व मुलींमध्ये पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी गटात चांदई ठोबरी,लांब उडी पहिली ते पाचवी मुले कार्तिक गाडेकर, सहावी ते आठवी मध्ये मुले करण ठोंबरे, मुलींमध्ये पहिली ते पाचवी सृष्टी गाडेकर 200 मिटर धावणे, पहिली ते पाचवी मुलांमध्ये सुदर्शन ठोंबरे व 100 मिटर धावणेमध्ये गणेश पिंपळे व 200 मिटर धावणे मुलींमध्ये कल्पना देठे,ईश्वरी मराठे यांनी क्रमांक पटकावला.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माधव गंदपवाड, दिपक गाडेकर, ज्ञानेश्वर गायके, बबन घुगे, सतिश आंबरे,सतीश इंगळे,विकास मोरे, आर.एच दानवे, अनिल वरकड, प्रवीण गंगावणे, उदय जगताप,भगवान लहाने, विजय साळवे, महेश लाभांगे, प्रशांत पिसे, अण्णा गटकाळ, बळीराम बरकले, अश्विनी सोनवणे, वर्षा औताडे, अर्चना राजे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!