दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची मागील दोन दिवसांपूर्वी भरदिवसा अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली. या दुर्दैवी घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्राभर उमटत आहेत. सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरातील मराठा समाजाच्या वतीने हसनाबाद पोलिसांना निवेदन देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये भरदिवसा अशा हत्येच्या घटना घडत असतील तर ही अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी बाब आहे.सर्वंच समाज घटकाने अशा घातक गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे असे निवेदनात म्हटले आहे.
देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांना मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले. निवेदनावर सचिन फटाले,राजू मिसाळ ,योगेश नागवे,शंकर जाधव,नारायण पवार,राम पुंगळे,धीरज कापरे,सचिन टोम्पे,उमेश पवार यांच्यासह समाज बांधवांच्या सह्या आहेत.
