दर्पण सह्याद्री न्यूज
भोकरदन :तालुक्यातील सोयगाव देवी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
यामध्ये सर्वश्री भरत गंभीरराव थिटे, भानुदास शेषराव रजाळे, योगेश शालिकराव थिटे, कौतिक गंभीरराव थिटे, सुदाम विठोबा रजाळे, आजिनाथ कडूबा रजाळे आणि पांडुरंग नाजूकराव रजाळे यांच्यासह अनेकांनी भाजपात प्रवेश केला.
माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रयत्नातून मतदारसंघात होत असलेल्या चौफेर विकास कामांवर प्रभावित होऊन वरील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी भाजपात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी जि. प. सदस्या आशाताई पांडे यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
