दर्पण सह्याद्री न्यूज
जालना: तालुक्यातील मोहाडी तांडा येथील जेष्ठ नागरिक व युवा कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर व भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून व मोहनराव आढे यांच्या पुढाकाराने शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.यावेळी छत्तीसगडचे माजी आमदार संजयजी संपत टकले ,माजी पंचायत समिती सदस्य रावसाहेब मामा राठोड,विनोद राठोड,ज्ञानेश्वर चव्हाण, बाजीराव कातारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य मोहन चव्हाण, विष्णू राठोड राजू राठोड, दिलीप राठोड, सुखदेव राठोड, माणिक राठोड,हरिचंद राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण,लहू राठोड, सुदाम चव्हाण, रंजीत राठोड, कृष्णा राठोड, अशा असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
