दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजुर: येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा.बाळासाहेब बोराडे यांनी आपले वडील कै.नारायणराव बोराडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त राजूरपासून जवळ असलेल्या कोठा दाभाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाणी बॉटल,वह्या,पेन,पेन्सिल, खोड रबर इत्यादी शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच अलकाताई शेजुळ,उपसरपंच मंतादादा शेजुळ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील शेजुळ, उपाध्यक्ष खंडू शेजुळ,केंद्रप्रमुख अण्णा इंगळे,मुख्याध्यापक गंदपवाड, सतीश आंबरे, आर.एच.दानवे, शालेय समिती सदस्य शालीकराव शेजुळ,बाबासाहेब शेजुळ,गावातील प्रतिष्ठित नागरिक एकनाथ शेजुळ,शंकर शेजुळ,जगन्नाथ शेजुळ, रामनाथ शिरसाठ, अजिनाथ शेजुळ एलआयसी अधिकारी नारायण डकले,सावित्रीबाई बोराडे,शिक्षिका श्रीमती खताळ, भारती बोराडे,शिक्षक सचिन शेजुळ,ऋषिंदर शेजुळ यांच्यासह विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन शेजूळ यांनी तर आभार प्रदर्शन सतीश आंबरे यांनी केले.
