दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:महाराष्ट्रात नुकतेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला होता.या अभियानात भोकरदन तालुक्यातील राजूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला असून प्रोत्साहन म्हणून शासनातर्फे दोन लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या दुसरा टप्पा सुरू असून यामध्ये भोकरदन तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांकास तीन लाख,द्वितीय क्रमांकास दोन लाख व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या शाळेस एक लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस ठेवण्यात आले होते. सहभागी शाळांचे भौतिक सुविधा,विद्यार्थी गुणवत्ता,सुंदर शाळा,प्रयोगशाळा, परिसर स्वच्छता, सुशोभीकरण, ग्रंथालय, बौद्धिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा,वृक्षारोपण, स्वच्छतागृह,शुद्ध पिण्याचे पाणी,लोकसहभाग यासारख्या अनेक निकषांवर मूल्यमापन करण्यात आले होते.
यासाठी शालेय समितीच्या अध्यक्षा शितल दारुवाले यांनी रुद्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष भीमाशंकर दारुवाले,उपाध्यक्ष पांडुरंग इंगळे यांचे मार्गदर्शन,आणि आर्थिक सहकार्य तसेच शालेय समिती पदाधिकारी,सदस्य,शिक्षक,पालक, विद्यार्थी यांच्या सहकार्यातून भिंतींचे सुशोभीकरण करून शाळा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी परिश्रम घेतले.शाळा समितीने स्वखर्चातून शिवदालन,संविधान दालन, परसबाग, ठीबक सिंचन,गांडूळ खत प्रकल्प ,रेन वॉटर हार्वेस्टिंग,सीसीटीव्ही कॅमेरे, मैदान सपाटीकरण,क्रीडा साहित्य,शाळा रंगरंगोटी यासह इतर भौतिक सुविधानिर्माण केल्या. सर्वांच्या प्रयत्नातून तालुकास्तरावर राजूर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला.
यास्पर्धेसाठी केंद्रप्रमुख रमेश पुंगळे,मुख्याध्यापक के.टी. इंगळे,शिक्षकवृंद,शालेय समिती अध्यक्षा शितल दारूवाले, उपाध्यक्ष सुनीता मगरे,संतोष पुंगळे,पांडुरंग इंगळे,मिलिंद मगरे,माया पवार,सोमीनाथ मोरे,सुरेश जाधव,कृष्णा डवले, स्वाती माठे,शितलपुंगळे,लक्ष्मण पुंगळे,आसमा शहा, सपना कांबळे,योगेश पुंगळे,रामेश्वर सोनवणे यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल सर्व स्तरातून शाळेचे कौतुक होत आहे.
