दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजुर: भोकरदन तालुक्यातील राजुर येथे ग्रामसंसद कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य आप्पासाहेब पुंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच गणपती संस्थान विश्वस्त गणेशराव साबळे,पंचायत समिती कर्मचारी कृष्णा पुंगळे,प्रा.बाळासाहेब बोराडे, लक्ष्मण कांबळे,विष्णू म्हसरूप आदी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा विजय असो,भारत माता की जय,वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.
याप्रसंगी सरपंच प्रतिभाताई भुजंग,उपसरपंच जिजाबाई मगरे,मा.सरपंच भाऊसाहेब भुजंग,ग्रामविकास अधिकारी प्रमोद पुंगळे,तलाठी व्ही.आर.गरड,ग्राम पंचायत सदस्य पंढरीनाथ करपे,आप्पासाहेब पुंगळे, परमेश्वर पुंगळे, रमेश पुंगळे.के.बी.पुंगळे,संदीप मगरे,गंगाधर पुंगळे,भीमाशंकर दारूवाले,संतोष पुंगळे,लक्ष्मण कुबेर,रामेश्वर टोम्पे,सतीश पुंगळे,विठ्ठल पुंगळे,कैलास गबाळे,शिवा बोर्डे,पांडुरंग इंगळे पद्माकर चंदनशिवे,साहेबराव पवार,गजानन डिक्कर,विष्णू मसरूप,लक्ष्मण कांबळे,भगवान जाधव,अनिता साठे,लता साबळे, लक्ष्मीबाई पवार,पल्लवी साळवे,विजया सोनवणे, सोनी पंडित तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अंकुश सोनवणे, भगवान सुद्रिक,गणेश पुंगळे,गजानन डवले,सोमीनाथ पुंगळे,विजय पुंगळे,अंबादास लोखंडे,पंडित मराठे,नारायण पवार,विष्णू वाकेकर,रामेश्वर पडोळ,छाया तायडे,सिकंदर शेख, विठ्ठलराव सोनवणे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
