दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर: जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपती संस्थान श्रीक्षेत्र राजूर येथे आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी राजुरेश्वराचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले.
तसेच सध्या पवित्र श्रावण महिना चालू असल्याने राजुरेश्वर मंदिर परिसरात असलेल्या हेमाडपंथी महादेव मंदिरातही भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने पूजाअर्चा करण्यात आली.
श्रीच्या दर्शनासाठी सकाळपासूनचगर्दी झाली होती. त्यामुळे भक्तांना रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागले. भाविकांकडून हार,श्रीफळ, पानफुल व प्रसादाची खरेदी केली जात होती .
गणपती संस्थांनच्या माध्यमातून दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी मंडप व पाणी व्यवस्था करण्यात आली होती. महिला व पुरुष सेवेकरीनी सफाई करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केला.
हीचतुर्थी श्रावण महिन्यात आली असल्याने भाविक या महिन्यात मोठ्या प्रमाणात व्रतवैकल्ये व उपवास करत असतात. त्याचे औचित्य साधून भक्तांनी चतुर्थीला राजुरेश्वराचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली.त्यामुळे भाविकांचीअधिकच गर्दी जाणवली.भाविकांनी राजुरेश्वराचे दर्शन घेतले.
वाहतुकव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी हसनाबद पोलिसांकडून जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले होते.आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून भक्तांनी मनोभावे राजुरेश्वराचे दर्शन घेतले.
गणपती मंदिर परिसरातील महादेव मंदिरातही झाली पूजाअर्चा
राजूर येथील महागणपती मंदिर परिसरात प्राचीनकाळी हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. श्रावणात महिन्यात भाविक मोठ्या प्रमाणात येथे दर्शनासाठी येतात. आज चतुर्थी निमित्त आलेल्या भाविकांनी राजुरेश्वरांस महादेव मंदिराती पिंडीवर बेलफुल वाहून मनोभावे पूजाअर्चा केली व शंभू महादेवाचे दर्शन घेतले .
