दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
भोकरदन : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
या परीक्षेत भोकरदन तालुक्यातील धावडा येथील श्री.रावसाहेब दानवे पाटील माध्यमिक आश्रम शाळेचा निकाल 100 % लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था व शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
आश्रमशाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांपैकी रचना राजकुमार वाघमारे आणि दिव्या शांतीलाल खैरे या दोघींनी (94.60) असे समान गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच वेदिका सुनील शिंदे आणि ऋतुजा गजानन शेळके यांनीही अनुक्रमे (94.20) असे समान गुणांसह प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळवला.

नेहा संतोषआप्पा घोडतुरे व विद्या विजय कालभिले यांनी देखील (94.00) समान गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला.आश्रमशाळेतील इतर 92 विद्यार्थी विशेषप्राविण्य श्रेणीत तर सहा विद्यार्थी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे,सचिव निर्मलाताई दानवे,मार्गदर्शक आमदार संतोष पाटील दानवे यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कौतिक खडके,अधीक्षक संजय गायके, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर सुरडकर, प्राचार्य किरण सपकाळ, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील डोंगरे यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

त्याचप्रमाणे आश्रमशाळेतील सर्व प्राध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
