दर्पण सह्याद्री न्यूज
बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर: राजूरपासून जवळ असलेल्या तपोवन शिवारातील शेतात अचानक हेलिकॉप्टर उतरल्याने एकच खळबळ उडाली होती.तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी हेलिकॉप्टर लँड करावे लागल्याची माहिती समोर आली आहे.हेलिकॉप्टर पहाण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.या घटनेबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते.घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चौकशी अंती तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग केल्याचे दिसून आले. हेलिकॉप्टरमधून पायलटसह तिघेजण प्रवास करत होते.सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. काही वेळाने हेलिकॉप्टरने पुन्हा यशस्वी उड्डाण केले.
सविस्तर माहिती अशी की सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील व राजूरपासून जवळ असलेल्या तपोवन तांडा शिवारात अचानकपणे हेलिकॉप्टर घिरट्या घालत असल्याचे दिसून आले.परंतु ते थोड्याच वेळात शेतात उतरल्याने एकच खळबळ उडाली.शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली.यावेळी हेलिकॉप्टर पहाण्यासाठी नागरिकांनीया गर्दी केली होती या घटनेबद्दल नागरिकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात होते. काहीकाळ आफवांचे पेव फुटले होते.सुरवातीला हे हेलिकॉप्टर प्रचार सभेचे असेल असा अंदाज लावला जात होता. काहींच्या मते हेलिकॉप्टरद्वारे रेल्वे लाईनच्या सर्वेक्षण चालू असतांना ते कोसळले तर काहींच्या मते यांमधून व्यापारी प्रवास करत होते.

परंतु आमच्या प्रतिनिधींनी हसनाबाद पोलिसांकडून माहिती मिळवली. त्यावरून असे लक्षात आले की हे हेलिकॉप्टर एका खाजगी कंपनीचे असून ते छत्रपती संभाजीगरहून नागपुला जाणार होते. परंतु मध्येच तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
कोट
शेतात हेलिकॉप्टर उतरल्याचे कळताच सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.प्राथमिक माहितीनुसार अग्निहोत्री प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हेलिकॉप्टरअसल्याचे दिसून आले. छत्रपती संभाजीनगरहुन नागपूरला व तेथून लुधियानाकडे रवाना होणार होते.बिघाड झाल्याने तात्काळ जमिनीवर उतरावे लागले.दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा ते नागपूरकडे रवाना झाले. हा कुठलाही घातपात नव्हता.या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
संजय अहिरे,
सहायक पोलीस निरीक्षक, हसनाबाद
