दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:येथून जवळ असलेल्या चिखली फाटा येथील स्टार इंटरनॅशनल स्कूलने महात्मा गांधी जयंती निमित्त वाघ्रुळ येथे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी ग्राम स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये प्रथम शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता जागरण फेरी काढली. यावेळी स्वच्छता विषयीच्या घोषणा देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय,मारोती मंदिर तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर स्वच्छता करून गावातील लोकांना स्वच्छता व शौचालयाचे महत्व पटवून दिले. विद्यार्थी व शिक्षाकांनी गाव स्वच्छ करून लोकांना आपले घर व परिसर स्वच्छ करण्याचा संदेश दिला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
यावेळी संस्था अध्यक्ष संदीप राठोड ,उपाध्यक्ष विक्रम राठोड, प्राचार्य सचिन सर,उपप्राचार्य आकाश शिंदे, यांनी खूप मेहनत घेतली होती. सोबत शाळेचे शिक्षक सचिन नाईक ,योगेश ढगे , स्नेहा लोणकर ,मनीषा घाटे , योगिता कांबळे ,रुपाली पिसाळ ,आदीजन उपस्थित होते.
