दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
जालना: भाजपचे ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना आर्थिक अडचणीत सापडला असून यातून बाहेर येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न चालू आहेत. परंतु अशातच जीएसटी विभागाने 19 कोटी रुपयांचा कर भरल्या नाही म्हणून कारखान्यास नोटीस पाठवून जप्तीचे आदेश काढला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. अशा बिकट परिस्थितीत जालना जिल्ह्यातील समर्थक पंकजा मुंडे यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.आम्ही फक्त ताईच्या आदेशाची वाट पाहत आहोत.ताईने आदेश दिल्यास जालना जिल्ह्यातून लाखोंची मदत देणार असल्याचे दसरा कृतीसमितीचे अध्यक्ष सचिन ढाकणे यांनी सांगितले.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखान्यावर काही दिवसांपूर्वी शासनाच्या जिएसटी विभागाने नोटीस बजावून 19 कोटी रुपये थकविल्या प्रकरणी जप्तीचे आदेश दिल्याने समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ही कारवाई राजकीय सुडबूद्धीने झाल्याचे म्हटले जात आहे.या घटनेचा जालना जिल्ह्यातील पंकजा मुंडे समर्थकांनी जाहीर निषेध केला आहे.
दसरा कृती समितीचे अध्यक्ष सचिन ढाकणे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की पंकजाताई यांच्या कारखान्यावर केलेली कारवाई सूडबुद्धींनी झाली असून 19 कोटीच काय पण समाज एकवटला तर जिएसटी विभागाचे खाते बंद करू असा इशाराही ढाकणे यांनी दिला आहे.
स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी मोठ्या कष्टाने वैद्यनाथ साखर कारखान्याची स्थापना केली होती.अनेक कष्टकरी,शेतकरी व ऊसतोड मजुरांची कुटुंबं या कारखान्यावर उपजीविका करतात.म्हणून कारखान्यावर जप्तीची कारवाई म्हणजे केवळ मुंडे परिवाराचा नव्हे तर ऊसतोड कामगार आणि कष्टकरी लोकांचा अवमान आहे.
यापुढे पंकजा मुंडेंचा अपमान सहन केला जाणार नाही-सचिन ढाकणे
पंकजा मुंडे यांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी चौहीबाजुनी प्रयत्न चालू आहेत.त्यामुळेच पंकजा मुंडेंना वारंवार अपमानित केले जात आहे.परंतु यापुढे हा अपमान सहन केला जाणार नाही.भविष्यात त्यांच्या समर्थनार्थ मोठा लढा उभारणार असून समाज बांधव त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील असे मत दसरा कृतीसमितीचे अध्यक्ष सचिन ढाकणे यांनी सांगितले.
