दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:भोकरदन तालुक्यातील जवखेडा खुर्द येथील
तरुण करण बाबासाहेब दानवे आणि मंगेश सुधाकर दानवे या दोन युवकांची भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे.
त्यानिमित्ताने राजूर येथे औक्षण करून पेढा भरवत निवड झालेल्या युवकांचा त्यांच्या पालकांसह शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
एप्रिल-2023 मध्ये सैन्यदलातील जागांसाठी लेखी परीक्षा झाली होती तर शारीरिक चाचणी जून-2023मध्ये घेण्यात आली होती. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये करण बाबासाहेब दानवे व मंगेश सुधाकर दानवे यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे.
जवखेडा खुर्द येथील युवकांची देशसेवेसाठी निवड झाली त्याबद्दल राजूर येथे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सुधाकरराव दानवे व त्यांच्या सुविद्य पत्नी योगिताताई दानवे यांच्या हस्ते सैन्यदलात भरती झालेल्या युवकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी भगवानराव नागवे,पंडितराव पुंगळे, डॉ. दीपक गाढवे,प्रा.बाळासाहेब बोराडे,सुधाकर दानवे, बाबासाहेब दानवे,बालू दानवे ,अशोक हाळदे आदी जणांनी सैन्यात भरती झालेल्या युवकांचे अभिनंदन केले.
