दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर:आगामी काळात येणारे पोळा,गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद यासारखे सर्वच उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात.परंतु अतिउत्साहाच्या भरात कुठे गालबोट लागू नये म्हणून भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.जी. एस.दराडे यांच्या अध्यक्षतेखाली राजूर पोलीस चौकीमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ.दराडे म्हणाले आगामी काळातील सर्वच उत्सव आनंदमय वातावरणात, धार्मिक व सामाजिक सलोखा राखत कायद्याच्या चौकटीत राहून साजरे करण्याचे आवाहन डॉ.दराडे यांनी नागरिकांना केले.
हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनानुसार राजूर पोलीस चौकीत शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजूर पोलीस चौकी अंतर्गत गावातील सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी,पत्रकार,तंटामुक्ती अध्यक्ष, शांतता समितीचे सदस्य,गणेश मंडळाचे पदाधिकारी, डी.जे.चालक-मालक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.दराडे म्हणाले की सामाजिक सलोखा जपत उत्सव साजरे करावे.कुठेही गालबोट लागू नये याची खबरदारी घ्यावी.त्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मदाय कार्यालय, पोलीस ठाणे तसेच ग्रामपंचायतची परवानगी घ्यावी.ध्वनी प्रदूषण टाळावे. वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करावे. पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्यावे.सर्व धर्मियांना सोबत घेऊन शांततेत उत्सव साजरे करावे असेही डॉ.दराडे म्हणाले.
यावेळी राजुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग, माजी उपसरपंच विनोद डवले,जिल्हा व्यापारी संघाचे सदस्य जगन्नाथ थोटे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्रीरामपंच पुंगळे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगवानराव नागवे,जेष्ठ पत्रकार श्यामराव पुंगळे,राम पारवे,प्रा.बाळासाहेब बोराडे, संजय पुंगळे,शिवाजी बोर्डे,साहेबराव पवार,दीपक घुगे, व्यापारी संघाचे सचिव रामेश्वर कढवणे,उपाध्यक्ष रामचंद्र नागवे,प्रभूराम पवार,राजू पठाण,ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पुंगळे, सुरेश पवार,विनोद तळेकर,राजू टाकळकर,तुळशीराम गायकवाड,प्रभू कढवणे,दादाराव पवार,विनायक झिने,विलास जाधव,शांतीलाल लोहिया,शालेय समितीचे अध्यक्ष संतोष पुंगळे,आशुतोष दारूवाले तसेच पोलीस कर्मचारी शिवाजी देशमुख,नरहरी खार्डे, राहुल भागीले,दीपक सोनुने यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बाळासाहेब बोराडे यांनी केले तर हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिवाजी नागवे यांनी आभार मानले.
कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही-सपोनि शिवाजी नागवे
यावेळी हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे म्हणाले की आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून आयटी सेलचे अधिकारी तसेच सायबर गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी हे समाजकंटकांवर नजर ठेवून आहेत.त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्यावयची आहे. ग्रामपंचायतने महापुरुषांची स्मारके सीसीटीव्ही कॅमेरेच्या निगराणीखाली आणल्यास गुन्हेगारांस पकडण्यास मदत होईल.गणेशोत्सवात कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही.त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा सपोनि शिवाजी नागवे यांनी दिला.
