दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर:हसनाबाद पोलीस ठाणे अंतर्गत राजूर पोलीस चौकी येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी जनार्धन अंबादास भापकर यांची राज्य शासनाच्या गृह विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार व जालना जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या आदेशानुसार जनार्धन भापकर यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे.हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांच्या हस्ते स्टार हे पदोन्नती चिन्ह लावून भापकर यांचे अभिनंदन करण्यात आले.
जनार्धन भापकर यांनी पोलीस दलामध्ये तीस वर्षाची सेवा पूर्ण केली असून त्यांनी जालना,भोकरदन,टेंभुर्णी या ठिकाणी कर्तव्य पार पाडले आहे. सध्या ते हसनाबाद पोलीस ठाण्यांतर्गत राजूर पोलीस चौकी येथे कार्यरत आहेत. भापकर यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल हसनाबद पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी ग्रेड पीएसआय शिवाजी देशमुख,राजू वाघमारे,हेड कॉन्स्टेबल नरहरी खार्डे ,राहुल भागिले,राजेंद्र पवार आदींनी अभिनंदन केले आहे.
