दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा. बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे यांचा राजूर व्यापारी महासंघाच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सर्वप्रथम सपोनि शिवाजी नागवे यांना व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा परिचय करून देण्यात आला.व्यापाऱ्यांची सुरक्षा आणि इतर विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे यांनीही व्यापाऱ्यांच्या चर्चेस सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हा सचिव जगन्नाथ थोटे,भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगवानराव नागवे,राजूर व्यापारी महासंघाचे शहर अध्यक्ष सारंगधर बोडखे,माजी सरपंच गजानन नागवे,माजी सरपंच अण्णासाहेब भालेराव आदींनी सपोनि शिवाजी नागवे यांचे स्वागत केले.
त्याचप्रमाणे राजूर व्यापारी महासंघाचे सचिव रामेश्वर कढवणे,व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष रामचंद्र नागवे, रामेश्वर नागवे,अंकुश नागवे,मुकेश अग्रवाल,गंगाधर आदमाने, प्रा.बाळासाहेब बोराडे,सोपान जावळे,लहु शेजुळ,लक्ष्मण कांबळे,देविदास खरात,मोहन बोडखे, विकास राठोड यांसह अनेकजण उपस्थित होते.
