दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर:आजादी का अमृत महोत्सव , हर घर तिरंगा या अभियानांतर्गत सरकारने शासकीय कार्यालय तसेच नागरिकांना त्यांच्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. हे अभियान भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.

हर घर तिरंगा हे अभियान दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या काळात सुरु राहणार आहे.या हेतूने ग्रामपंचायत पिंपळगाव सुतार येथे मोहिमेंतर्गत दुसऱ्या दिवशीचे ध्वजारोहण भारतीय सेनेचे जवान मधुकर काशिनाथ दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मा.पं.समिती सदस्य सोमीनाथ हराळ, सरपंच शारदाताई मनोहर,ग्रामसेविका वाहुळे मॅडम,मुख्याध्यापक रामेश्वर चेके,बळीराम बरकले,ज्ञानेश्वर हराळ, कृष्णा हराळ, बालू वनारसे,आत्माराम वनारसे,नाना दानवे,परमेश्वर वनारसे व गावकरी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
