दर्पण सह्याद्री न्यूज
औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई व दैनिक मराठवाडा साथी’च्या वतीने देण्यात येणारा पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार-2023 ची घोषणा निवड समितीने जाहीर केली आहे.यामध्ये दैनिक आधुनिक केसरीचे जालना जिल्हा प्रतिनिधी पत्रकार प्रा.बाळासाहेब बोराडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यांना हा पुरस्कार औरंगाबाद येथील एका विशेष पुरस्कार वितरण समारंभामध्ये देण्यात येणार आहे अशी माहिती राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी दिली.राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल राज्य पत्रकार संघाचे प्रदेशअध्यक्ष वसंत मुंढे,मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदूलाल बियाणी, दैनिक आधुनिक केसरीचे संपादक डॉ. प्रभू गोरे,व्यवस्थापकीय संपादक संजय व्यापारी व दैनिक आधुनिक केसरीच्या टीमने प्रा.बाळासाहेब बोराडे यांचे अभिनंदन केले आहे.राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रा.बोराडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राजूर मराठी पत्रकार संघाच्या वतीनेही त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
