दर्पण सह्याद्री न्यूज
मंठा: तालुक्यातील माळतोंडी येथील युवकांचा माजीमंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर ,भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि नरेंद्र ताठे यांच्या पुढाकाराने माळतोंडी येथील अनेक युवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला.प्रवेशामध्ये संतोष राठोड,प्रकाश लहाने,आसाराम ताठे,वैभव ताठे, आदित्य ताठे, गजु ताठे,मुकेश जाधव ,अमर वायाळ,बबलू तायडे, डिगांबर वायाळ ,यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना प्रवेश केला.यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संपतराव टकले, नगरसेवक दीपक बोराडे,नगरसेवक प्रवीण सातोनकर, तोफिक भाई,मनोज देशमुख, संदीपराव खंदारे, किशोर खंदारे यांची प्रमुख उपस्थित होती.
