दर्पण सह्याद्री न्यूज
छत्रपती संभाजीनगर:- स्वर्गीय रामभाऊ किसन घोंगडे यांच्या समूर्तीप्रित्यर्थ शब्दस्वरूप साहित्य मंचाद्वारे आयोजित श्री.श्रुंगेरीदेवी दुसरा राज्यस्तरीय काव्यमहोत्सव नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील भावना विजय मोगल या विद्यार्थिनीने कविता सादरीकरणातून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळवत काव्यवाचन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.

25 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील कृष्णराज मंगल कार्यालयात राज्यस्तरीय भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.हे कवी संमेलन सकाळ आणि दुपार असे दोन सत्रांमध्ये घेण्यात आले होते.या काव्यवाचन संमेलनासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून नवोदित कवी स्पर्धेसाठी उपस्थित झाले होते.

या काव्य स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील भावना विजय मोगल या विद्यार्थिनीने’जिथे प्रेम आहे’ ही कविता सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.या काव्य स्पर्धेत तिने पारितोषिक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

यावेळी संमेलन अध्यक्ष तथा पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांतदादा वानखेडे, आयोजक तथा शब्दस्वरूप साहित्य संमेलनाच्या संस्थापक अध्यक्षा- सौ.पूजा घोंगडे, उपाध्यक्ष विलास नवसागरे आदी मान्यवरांच्या हस्ते भावना मोगल हीस स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

काव्यवाचन स्पर्धेतील यशाबद्दल भावना मोगल हिचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
