दर्पण सह्याद्री न्यूज
माझी राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती प्रसार माध्यमातून समोर येत आहे.त्यामुळे आमदार बच्चू कडू यांना अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृतीत सुधारणा होऊन पूर्वपदावर येत असल्याचे म्हटले जात आहे.
आमदार बच्चू कडू हे सकाळी पायी चालत होते. रस्ता ओलांडत असतांना एका मोटार सायकल स्वाराने बच्चू कडू यांना जोरदार धडक दिल्याने ते रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.आमदार बच्चू कडू यांच्या हातापायालाही जबर मार लागल्यामुळे त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आता त्यांची प्रकृती चांगली असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
